परभत पररथन
परभत पररथन

ईसाई ऑर्थोडॉक्स प्रार्थना पुस्तक

परभत पररथन

भारतीय ऑर्थोडॉक्स मंडळी मॉस्को धर्मपीठ / भाषांतरः फादर क्लेमेंट नेहमाय
यह पाठ अन्य भाषाओं में उपलब्ध है:

झोपेतून उठल्यावर, कोणत्याही कार्याआधी, स्वतःला सर्वदर्शी देवाच्या उपस्थितीत मानून, आदराने उभे रहावे व कृसाचे चिन्ह करीत म्हणावेः

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात. आमेन.

मग जोपर्यंत तुमच्या सर्व इंद्रिया शांत होत नाहीत व तुमचे विचार सर्व जगिक गोष्टींचा त्याग करीत नाहीत तोपर्यंत क्षणभर थांबावे आणि मग तीनदा वाकून नमन करतांना म्हणावेः

जकातदाराची प्रार्थना

हे देवा, मज पाप्यावर दया कर. ()

सुरुवातीची प्रार्थनाः

हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, तुझ्या परम शुद्ध आईच्या व सर्व संतांच्या प्रार्थनांद्वारे, आम्हावर दया कर. आमेन.

तुला गौरव, आमच्या देवा, तुला गौरव.

हे स्वर्गीय राजा, कैवाऱ्या, सत्याच्या आत्म्या, जो सर्वत्र आहेस व सर्वव्यापी आहेस, आशीर्वादांच्या खजिन्या (कोषा) व जीवनदात्याः हे उत्तमा, ये आणि आम्हामधे वस्ती कर, व सर्व अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध कर व आमच्या आत्म्याचे तारण कर.

[पास्का ते स्वर्गारोहण समयात "पवित्र देवा, पवित्र शक्तिमान..." ऐवजी पुढे दिलेले पास्काचे त्रोपारीओन तीनदा म्हणावेः मृत्युद्वारे मृत्यूला तुडवून आणि कबरेत असलेल्यांना जीवन देऊन ख्रिस्त मृतांतून उठला आहे. ()]

पवित्र देवा, पवित्र शक्तिमान, पवित्र अमर्त्या, आम्हावर दया कर. ()

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.

हे परम पवित्र त्रैका, आम्हावर दया कर. हे प्रभू, आमचे पाप पुसून टाक. हे स्वामी, आमच्या अपराधांची क्षमा कर. हे पवित्रा, आमची भेट घे आणि तुझ्या नावाखातर आमच्या दुर्बलता बऱ्या कर.

प्रभू दया कर! ()

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.

हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो. जेसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हांस वाईटापासून सोडीव. (कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव, पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या तुझीच आहेत आता आणि सर्वकाळ व युगानुयुग.)

पवित्र त्रैकाला त्रोपारीओनः

झोपेतून उठून, हे उत्तमा, आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, व स्वर्गदूतांचे गीत, हे शक्तिमाना, मोठ्याने आम्ही तुला गातोः पवित्र, पवित्र, पवित्र आहेस तू, हे देवा; ईशजननीच्या प्रार्थनांद्वारे आम्हावर दया कर.

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो,

अंथरुणावरून व झोपेतून तू मला उठविले आहेस, हे प्रभूः माझे मन व हृदय प्रकाशित कर आणि हे पवित्र त्रैका, मी तुला गीत गावे म्हणून माझे ओठ उघडः पवित्र, पवित्र, पवित्र आहेस तू, हे देवा; ईशजननीच्या प्रार्थनांद्वारे आम्हावर दया कर.

आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

न्यायाधीश अकस्मात येईल, आणि प्रत्येकाची कृत्ये उघड केली जातील; परंतु भयासह मध्यरात्री आम्ही धावा करितोः पवित्र, पवित्र, पवित्र आहेस तू, हे देवा; ईशजननीच्या प्रार्थनांद्वारे आम्हावर दया कर.

प्रभू दया कर. (१२)

संत बॅसिल महानची परम पवित्र त्रैकाला प्रार्थनाः

झोपेतून उठून, हे पवित्र त्रैका, तुझे मी आभार मानतो, कारण तुझ्या महान चांगुलपणाद्वारे व सहनशीलतेद्वारे तू मज आळश्या व पाप्यावर क्रोधीत झाला नाही, किंवा माझ्या अपराधांसह माझा नाश केला नाहीस तर नेहमीप्रमाणे मानवजातीला तुझे प्रेम दाखविले आहेस आणि जेंव्हा निराशेमध्ये मी लोळलेला होतो, तेंव्हा पहाटे जागृत राहण्यासाठी व तुझ्या सामर्थ्याचे गौरव करण्यासाठी तू मला उठविले. मी तुझ्या शब्दांवर मनन करावे, आणि तुझ्या आज्ञांना समजावे व तुझ्या इच्छेनुसार चालावे म्हणून आता माझ्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशीत कर व माझे मुख उघड म्हणजे हृदयपूर्ण अंगिकाराणे तुला मी गीत गावे आणि पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, तुझ्या परम पवित्र नावाची स्तुती करावी आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

[पास्का ते स्वर्गारोहण समयात 'या आपण उपासना करू" ऐवजी पुढे दिलेले पास्काचे त्रोपारीओन तीनदा म्हणावेः मृत्युद्वारे मृत्यूला तुडवून आणि कबरेत असलेल्यांना जीवन देऊन ख्रिस्त मृतांतून उठला आहे. ()]

या, राजाची आपल्या परमेश्वराची आपण उपासना करू.

या, राजाची आपल्या परमेश्वराची, ख्रिस्ताची आपण उपासना करू व त्याला नतमस्तक होऊ.

या, राजाची आपल्या परमेश्वराची, खुदद् ख्रिस्ताची आपण उपासना करू व त्याला नतमस्तक होऊ.

स्तोत्र ५०/५१

हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा निःस्पृह ठरशील. पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर; म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ; म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्हे अर्पण करतील.

ऑर्थोडॉक्स विश्वासंगीकरः

सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृष्य व अदृष्य वस्तु यांचा उत्पन्न कर्ता, त्याजवर मी विश्वास ठेवितो/ ठेविते.

एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकूलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासुन जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरिया, हिजपासून देहधारी होऊन मनुष्य झाला, आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला कृशी दिले, ज्याने दुःख भोगीले व ज्याला पुरिले, जो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायाला गौरवाने पुन्हा येणार आहे. ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याजवर मी विश्वास ठेवितो/ठेविते.

आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पित्यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या सहीत ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांकडून बोलत असे, त्याजवर मी विश्वास ठेवितो/ ठेविते.

आणि एक, पवित्र, सार्वत्रिक व प्रेषितीय मंडळीविषयी मी विश्वास धरीतो/धरीते. पापांच्या क्षमेसाठी एक बात्पिस्मा आहे, असे मी पत्करीतो / पत्करीते. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन, यांची मी प्रतिक्षा करीतो/करीते. आमेन.

प्रार्थना १ ली, संत माकारिअस महानचीः

हे देवा, तुझ्या दृष्टीपुढे मी कधीही काहीही चांगले केले नाही; म्हणून मज पाप्याला शुद्ध कर, आणि वाईटापासून मला सोडिव, व माझ्यामध्ये तुझी इच्छा पूर्ण होउदे म्हणजे बिनदोष मी माझे अयोग्य मुख उघडावे आणि पित्या, पुत्रा आणि पवित्र आत्म्या, तुझ्या नावाची स्तुती करावी आता, आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना २ री, संत माकारिअस महानचीः

झोपेतून उठून, हे तारणाऱ्या, मध्यरात्रीचे गीत मी तुला अर्पितो, आणि खाली पडून मी तुला आरोळी मारतोः पापाच्या मरणात मला झोपी जाऊ देऊ नको तर हे स्वइच्छेने वधस्तंभावर जाणाऱ्या स्वामी, माझ्यावर दया कर, आणि आळसपणात लोळत पडलेल्या मज (पाप्याला) उठविण्याची त्वरा कर व तुजपुढे प्रार्थनेमध्ये उभ्या असलेल्या मज (दीनास) तार आणि हे ख्रिस्ता परमेश्वरा, रात्रीच्या झोपेनंतर निष्पाप (पवित्र) दिवस माझ्यावर चमकव (प्रकाशित कर) आणि मला तार.

प्रार्थना ३ री, संत माकारिअस महानचीः

हे स्वामी, मानव प्रियकरा, झोपेतून उठून, मी तुझ्याकडे धाव घेतो आणि तुझ्या वात्सल्याद्वारे, तुझे कार्य करण्याची मी धडपड करितो व तुला प्रार्थितोः सर्वदा, सर्व कार्यामध्ये मला मदत कर आणि सर्व जगिक, वाईट गोष्टी आणि प्रत्येक सैतानी प्रेरणेपासून मला सोडिव आणि माझे तारण कर व तुझ्या सार्वकालिक राज्यात मला घेऊन चल. कारण तू माझा निर्माणकर्ता, व सर्व उत्तम गोष्टींचा दाता व पूरक आहेस आणि तुझ्यावर माझी सर्व अशा आहे व तुझे मी गौरव करितो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ४ थी, संत माकारिअस महानचीः

हे प्रभू, तू आपल्या विपुल चांगुलपणाद्वारे व तुझ्या महान करुणेद्वारे, मला-तुझ्या दासाला, रात्रीच्या गत काळातून विरोधकाच्या दुष्ट हल्याशिवाय पार जाऊ दिले: तूच, हे स्वामी, सर्वांच्या निर्माणकर्त्या (सर्वकर्तृ), असे प्रदान कर कि तुझ्या सत्य प्रकाशाने व प्रकाशित हृदयासह मी तुझ्या इच्छेनुसार चालावे, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ५ वी, संत बॅसिल महानचीः

उर्ध्वलोकी वस्ती करणाऱ्या आणि पृथ्वीवर अवलोकन करणाऱ्या, हृदयाचे व अंतर्यामीचे निरीक्षण करणाऱ्या आणि मनुष्याचे गूढ स्पष्टपणे जाणणाऱ्या, हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, सैन्यांच्या (देवदूतांच्या) व सर्व देहधाऱ्यांच्या देवा, ज्यामध्ये परिवर्तन किंवा बदलाची छाया नाही अशा अनादी व सनातन प्रकाशाः हे अमर राजा, तुझ्या अपार करुणेमुळे धाडस करून, ह्या वर्तमान काळात भ्रष्ट ओठांनी तुला अर्पण केलेल्या आमच्या विनंत्या तू स्वीकार आणि आम्ही कृत्यांनी, शब्दांनी व विचारांनी, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी केलेल्या आमच्या पापांची क्षमा कर आणि देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक भ्रष्टतेपासून आम्हाला शुद्ध कर. आणि ह्या संपूर्ण वर्तमान जीवनाच्या रात्रीतून जागृत हृदय व शांतचित्तासह, तुझ्या एकुलत्या एक पुत्राच्या, आमच्या प्रभू, देव व तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या येणाऱ्या तेजस्वी व नियुक्त दिवसाची – जेंव्हा सर्वांचा न्यायाधीश प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देण्यास गौरवासह येईल – सदा अपेक्षा करीत आम्हास पार निघू दे. जेथे उत्सव करणाऱ्यांचा स्वर निरंतर आहे आणि तुझ्या मुखाचे अवर्णनीय सौंदर्य निहाळणाऱ्यांचे सुख शब्दातीत आहे, तेथे त्याच्या आनंदात व गौरवाच्या दैवी महालात त्याच्या सोबत जाण्यास आम्ही दक्ष व कार्यामध्ये प्रामाणिक, तयार असे सापडावे व पतित व आळशी सापडू नये. कारण सर्वांना प्रकाशित व पवित्र करणारा तू खरा प्रकाश आहे आणि सर्व सृष्टी तुला गीत गाते, युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ६ वी, संत बॅसिल महानचीः

आम्हासंगती असीम अश्या महान व अगम्य, गौरवी व भयप्रद गोष्टी करणाऱ्या, आम्हाला आमच्या अशक्ततेपासून विश्रामासाठी झोप आणि आमच्या कष्टी देहाच्या श्रमापासून आराम प्रदान करणाऱ्या, हे परात्पर देवा व दयेच्या प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो कारण आमच्या अपराधांबरोबर तू आमचा नाश केला नाही तर नेहेमीप्रमाणे मानवास वात्सल्य दाखविले आणि जेंव्हा निराशेमध्ये आम्ही आमच्या अंथरुणावर पडलो होतो, तेंव्हा तुझ्या सत्तेचे गौरव करण्यासाठी तू आम्हाला उठविले. त्यामुळे, तुझ्या अमर्याद चांगुलपणापुढे आम्ही याचना करतोः आमच्या समजेच्या डोळ्यांना प्रकाशित कर आणि आळशीपणाच्या गाढ झोपेतून आमचे मन वर उचल; आमचे मुख उघड आणि तुझ्या स्तुतीने ते भर म्हणजे सर्वांमध्ये व सर्वांद्वारे गौरवीत, अनादी पित्या, तुझ्या एकुलत्या एक पुत्रासह आणि तुझ्या परम पवित्र व जीवनदायी आत्म्यासह, सतत आम्ही तुला गीत गावे व तुझा अंगीकार करावा, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ७ वीः परम पवित्र थेओटोकोसला (ईशजननीला) गीतः

तुझ्या कृपेचे गीत मी गातो, हे स्वामिनी, आणि तुला विनवितो माझे मन कृपेने भर. ख्रिस्ताच्या आज्ञांच्या पथावर योग्यतेणे चालणे मला शिकिव. गीतांमध्ये जागे राहण्यासाठी मला बळ दे आणि निराशेची झोप माझ्यापासून दूर कर. हे देवाची वधू, पापाच्या बेड्यांच्या बंधनात असलेल्या माझी, तुझ्या प्रार्थनांद्वारे सुटका कर. अहोरात्र माझे रक्षण कर, आणि माझ्यावर प्रहार करणाऱ्या शत्रूपासून मला सोडिव. जीवनदात्या देवाची जननी, वासनांद्वारे मृत झालेल्या मज (पाप्याला) पुनरुज्जीवित कर. हे अक्षय प्रकाशाची जननी, माझ्या अंध आत्म्याला प्रकाशित कर. हे स्वामीच्या अद्भुत राजभवना, मला दैवी आत्म्याचे भवन कर. हे वैद्याच्या जननी, माझ्या आत्म्याच्या निरंतर वासना बऱ्या कर. जीवनाच्या वादळात मी फेकला गेलो आहे म्हणून पश्चातापाच्या पथावर माझे मार्गदर्शन कर. अनंत ज्वालांपासून, अभद्र अळ्यांपासून आणि अधोलोकाच्या तुरुंगापासून (तारतारोस) माझी सुटका कर. माझ्या पुष्कळ पापांमुळे मला दुरात्म्यांच्या आनंदाचे कारण होऊ देऊ नको. हे परम शुद्ध स्वामीनी, मूर्ख पापांमुळे जीर्ण झालेल्या मज (दीनास) नूतन कर. पिडांद्वारे अस्पृश्य असे मला प्रस्तुत कर व सकल स्वामीकडे मजसाठी प्रार्थना कर. सर्व संतांसह स्वर्गीय आनंद मिळणे कृपेने मज प्रदान कर. हे परम पवित्र कुमारी, तुझ्या अनुपयुक्त सेवकाची वाणी ऐक. हे परम शुद्ध माते, अशुद्धतेपासून माझ्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी मला अश्रुधारा प्रदान कर. हे स्वामिनी, माझ्या हृदयाचे कण्हणे मी तुला निरंतर सादर करतो, माझ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. माझ्या याचनांची सेवा स्वीकार आणि दयाळू परमेश्वरासमोर ती सादर कर. हे स्वर्गदूतांपेक्षा उच्च माते, ह्या जगाच्या गोंधळापासून तू मला वर उचल. हे प्रकाशधर स्वर्गीय मंडपा, आत्म्याच्या कृपेला मजमध्ये निर्देशित कर. हे निष्कलंक माते, माझे हात व ओठ जरी अशुद्धतेमुळे भ्रष्ट आहेत, तरीहि तुझ्या स्तुतीमध्ये ते मी उंचावतो. आत्म्याला भ्रष्ट करणाऱ्या वाईटांपासून माझी सुटका कर आणि खिस्तापुढे कळकळीची प्रार्थना कर, त्यालाच आदर व उपासना देय आहे, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ८ वीः आपल्या प्रभू येशू खिस्तालाः

हे माझ्या विपुल करुणाकरा व परम दयाळू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या महान प्रीतीमुळे, सर्वांना तारणासाठी तू स्वर्गातून उतरला आणि देहधारी झाला. आणि पुन्हा, हे तारणाऱ्या, मी तुला प्रार्थना करतो, तुझ्या कृपेने मला तार. कारण, हे महान करुणाकरा, अवर्णनीय दयाळा, जर माझ्या कर्मामुळे तू मला तारिले तर ती कृपा किंवा दान राहणार नाही तर कर्तव्य असे होईल. कारण हे माझ्या ख्रिस्ता, जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल, असे तू म्हटले आहे. जर तुझ्यावरील विश्वास आशाहीनांना तारितो, तर पहा, मी विश्वास करतो, मला तार, कारण तू माझा परमेश्वर व निर्माणकर्ता आहेस. हे माझ्या देवा, कर्माच्या ऐवजी माझ्या विश्वासाची गणना कर (माझा विश्वास मोज), कारण माझे समर्थन करतील असे कोणतेही कर्म तुला सापडणार नाहीत. परंतु सर्व कर्मांच्या ऐवजी माझा विश्वास पुरेसा होवो, तो माझ्यासाठी उत्तर देवो, तो माझे समर्थन करो, तो मला तुझ्या अक्षय गौरवाचा सहभागी बनवो. आणि हे (देवाच्या) शब्दा, सैतानाने मला तुझ्या हातातून व कळपातून हिसकावून घेतले आहे अशी त्याला माझ्यावर ताबा करून शेखी मिरवू देऊ नको. परंतु माझी इच्छा असो अथवा नसो, मला तार, हे खिस्ता माझ्या तारणाऱ्या, माझ्या मदतीला त्वरित ये, त्वरा कर कारण माझा नाश होत आहे. माझ्या आईच्या उदरातूनच तू माझा देव आहेस. हे प्रभू, जितकी प्रीती कधी मी पापावर केली तितकी प्रीती मी तुझ्यावर करावी आणि जसे मी आधी भ्रामक सैतानासाठी कार्य केले तसेच आळसाविना, काळजीपूर्वक तुझ्यासाठी मी कार्य करावे असे तू प्रदान कर. माझ्या प्रभू परमेश्वरा, येशू ख्रिस्ता, माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी मी निरंतर सेवा करील, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.

प्रार्थना ९ वीः पवित्र रक्षक दूतालाः

माझ्या दीन आत्म्याच्या व विकारयुक्त जिवाच्या बाजूस उभे असणाऱ्या, हे पवित्र देवदूता, मज पाप्याचा त्याग करू नको किंवा माझ्या असंयमामुळे मजपासून विलग होऊ नको. धूर्त दुरात्म्याला माझ्या देहाद्वारे माझ्यावर ताबा मिळविण्याची जागा देऊ नको, माझा दीन व अशक्त भुज समर्थ कर आणि तारणाच्या मार्गात माझे मार्गदर्शन कर. होय, हे देवाच्या पवित्र दूता, माझ्या खिन्न आत्म्याच्या व देहाच्या पालका व रक्षका, माझ्या जीवनाचे सर्व दिवस ज्याहि बाबतींत मी तुला दुखाविले आहे त्या बद्दल मला क्षमा कर आणि जर मागील रात्री मी पाप केले असेल तर वर्तमान दिवसात माझे रक्षण कर व कोणत्याही पापाद्वारे मी देवाला क्रोधीत करू नये म्हणून शत्रूच्या सर्व परीक्षांपासून (भुरळींपासून) माझे संरक्षण कर. आणि प्रभूने मला त्याच्या भयामध्ये उभारावे (स्थिर करावे) व मज सेवकाला त्याच्या चांगुलपणासाठी योग्य दाखवावे म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. आमेन.

प्रार्थना १० वीः परम पवित्र थेओटोकोसला (ईशजननीला):

हे माझ्या परम पवित्र स्वामिनी ईशजननी, तुझ्या पवित्र व महा- सामर्थ्यवान प्रार्थनांद्वारे, तुझ्या दीन व खिन्न सेवकापासून, निराशा, विसरभोळेपणा, मूर्खता, निष्काळजीपणा आणि माझ्या दीन हृदयापासून व अंध:कारीत मनापासून सर्व घाण, दुष्ट व ईशनिंदक विचार दूर कर. आणि मी दीन व दरिद्री आहे म्हणून माझ्या वासनांच्या ज्वाला विझव, आणि पुष्कळ व क्रूर आठवणीपासून व कृत्यांपासून माझी सुटका कर आणि त्यांच्या सर्व वाईट परिणामांपासून मला मुक्त कर. कारण सर्व पिढयांद्वारे तू धन्यवादित आहेस आणि तुझे अति आदरणीय नाव गौरवीत आहे, युगानुयुग. आमेन.

ज्या संतांचे नाव धारण केले आहे त्याला प्रार्थनापूर्ण आवाहनः

माझ्या जिवाचा वेगवान सहायक व मध्यस्त, हे पवित्र ईश संतुष्टक.... (संतांचे नाव)..., मी कळकळीने तुझा धावा करितो म्हणून माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना कर.

परम पवित्र थेओटोकोसला गीतः

हे ईशजननी कुमारी, आनंदित हो, कृपा पूर्ण मरीये, प्रभू तुजबरोबर आहे; स्त्रियांमध्ये तू धन्य व धन्य तुझ्या पोटचे फळ कारण तू आमच्या जिवाच्या तारणाऱ्याला जन्म दिला आहेस.

कृसाला त्रोपारीओनः

हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना तार व आपल्या वतनाला आशीर्वाद दे. (ऑर्थोडॉक्स) विश्वासणाऱ्यांना शत्रूवर विजय प्रदान कर आणि तुझ्या कृसाद्वारे तुझ्या लोकांचे रक्षण कर.

मग आपल्या अध्यात्मिक पित्याच्या, आपल्या पालकांच्या, नातेवाईकांच्या, धर्माधिकाऱ्यांच्या, हितकर्त्यांच्या, आपल्याला माहित असलेल्यांच्या, आजाऱ्यांच्या किंवा दुःखातून जात असलेल्यांच्या आरोग्यासाठी व तारणासाठी एक लहान प्रार्थना करावी.

जीवितांसाठीः

हे प्रभू, माझा अध्यात्मिक पिता (नाव), माझ्या आई-वडिल (नावे), नातेवाईक (नावे), वरिष्ठ, मार्गदर्शक, हितकर्ते, अधिकारी (नावे) ह्या तुझ्या सेवकांवर आणि सर्व ऑर्थोडॉक्स (सम्यग्दृ ष्टि) ख्रिस्तींवर दया कर आणि त्यांचे तारण कर.

निवर्तलेल्यांसाठी (म्हणजे दिवंगतांसाठी):

हे प्रभू, माझे पालक (नावे), नातेवाईक, हितकर्ते (नावे) आणि सर्व ऑर्थोडॉक्स (सम्यग्दृष्टि) ख्रिस्ती, ह्या तुझ्या निवर्तलेल्या दासांच्या आत्म्यांना विश्राम दे आणि त्यांच्या सर्व ऐच्छिक-अनैच्छिक पापांना क्षमा कर व स्वर्गीय राज्य त्यांना प्रदान कर.

(शक्य असल्यास हे स्मरण वाचावेः)

ईशजननी (थेयोटोकोसला) स्तोत्रः

हे ईशजननी, सदा धन्य परम शुध्द आमच्या देवाची आई, तुला धन्यवाद देणे खरोखर योग्य आहे करूबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी, आणि अतुलनीय मलिन न होता तु देवाच्या शब्दाला जन्म दिला. हे सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.

तुला गौरव असो, हे खिस्ता आमच्या देवा, आमची निश्चीत आशा, तुला गौरव असो.

पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन. प्रभु, दया कर..........()

(याजक उपस्थित असल्यास म्हणावेः आशिर्वाद द्या, पवित्र आचार्य.)

हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, तुझ्या परम शुद्ध आईच्या, आमच्या पवित्र व देवधर वडिलांच्या आणि सर्व संतांच्या प्रार्थनांखातर, आम्हावर दया कर, आमेन.

आमेन.

टिप्पणियाँ

ईसाई ऑर्थोडॉक्स प्रार्थना पुस्तक

भारतीय ऑर्थोडॉक्स मंडळी मॉस्को धर्मपीठ

भाषांतरः फादर क्लेमेंट नेहमाय

85
उपयोगकर्ता द्वारा प्रकाशित: Rodion Vlasov
सुधारना या जोड़ना चाहते हैं? हमें लिखें: https://t.me/bibleox_live
या स्वयं लेख संपादित करें: संपादित करें