येशू प्रार्थना
हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, मज पाप्यावर दया कर.
भोजना आधीची प्रार्थना
न्याहारी आधी
हे परम पवित्र त्रैका, आम्हावर दया कर! प्रभू, आमच्या पापांपासून आम्हाला शुद्ध कर ! स्वामी, आमच्या अपराधांची क्षमा कर! हे पवित्रा, तुझ्या नावा खातर भेट घे आणि आमच्या दुर्बलता बऱ्या कर.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
हे खिस्ता परमेश्वरा, तुझ्या सेवकांचे भोजन व पेय आशीर्वादित कर, कारण तू पवित्र आहेस, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
दुपारच्या जेवणाआधी
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करितो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हांस वाईटापासून सोडिव.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
हे खिस्ता परमेश्वरा, तुझ्या सेवकांचे भोजन व पेय आशीर्वादित कर, कारण तू पवित्र आहेस, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
रात्रीच्या जेवणाआधी
दीन जण अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराचा शोध करणारे त्याची स्तुति करितील; त्यांचे हृदय सदैव जीवित राहील !
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
हे खिस्ता परमेश्वरा, तुझ्या सेवकांचे भोजन व पेय आशीर्वादित कर, कारण तू पवित्र आहेस, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
भोजना नंतरची प्रार्थना
न्याहारी नंतर
करुबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी आणि अतुलनीय, मालिन न होता तू देवाच्या शब्दाला जन्म दिला, सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
मानवावरील त्याच्या कृपे व प्रीतीद्वारे, परमेश्वर आम्हासंगती आहे, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
दुपारच्या जेवणानंतर
तू आम्हाला तुझ्या पृथ्वीवरील दानांनी तृप्त केले आहेस म्हणून, हे खिस्ता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या स्वर्गीय राज्यापासून आम्हाला वंचित करू नको, हे तारणाऱ्या, तर ज्याप्रकारे तू आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना शांती दिली, तसेच आम्हाकडे ये आणि आम्हाला तार !
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
धन्य आहे तो परमेश्वर, ज्याने मानवावरील त्याच्या कृपे व प्रीती द्वारे आम्हावर दया दाखविली आणि त्याच्या संपन्न दानांतून आम्हाला भरविले, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
रात्रीच्या जेवणानंतर
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
स्वर्गीय भाकर-ख्रिस्त आमच्या देवाला – (उदरात) बाळगून तुझे उदर स्वर्गीय मेज बनले. हे ईशजननी, सर्वपोषकाच्या शब्दानुसार (सर्वांचे पोषण करणाऱ्याच्या शब्दानुसार) जो कोणी त्यातून सेवन करेल तो मरणार नाही.
करुबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी आणि अतुलनीय, मालिन न होता तू देवाच्या शब्दाला जन्म दिला, सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.
हे प्रभू, तुझ्या कृत्यांद्वारे तू आम्हाला आनंदित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांत आम्ही उल्हास करू. तुझा मुखप्रकाश, हे प्रभू, आम्हावर पाड! तुझा आनंद तू माझ्या हृदयात घातला आहेस. गहू, द्राक्ष व तेलाच्या फळासह आम्ही तृप्त झालो आहोत. शांतीमध्ये मी पडणार (लेटणार) व झोपी जाणार, कारण केवळ तू, हे प्रभू, मला आशेमध्ये वसवितोस.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
प्रभू दया कर! (३)
मानवावरील त्याच्या कृपे व प्रीतीद्वारे, परमेश्वर आम्हासंगती आहे, सदैव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग. आमेन.
संत बेनेडिक्तची प्रार्थना
पवित्र कृस माझा प्रकाश होवो. सैतान माझा मार्गदर्शन न होवो. माझ्यापासून चालता हो सैताना! तुझ्या व्यर्थतेद्वारे माझी परीक्षा करू नको. तुझ्यापासून ओतले जाणारे सर्व काही वाईट आहे. तुझे विष तूच पी ! आमेन.
आजाऱ्यांसाठी प्रार्थना
हे खिस्ता, आमच्या अनन्य रक्षका, तुझा/तुझी/तुझे पीडित दास/दासी... .. ह्यांची भेट घे आणि त्यांना बरे कर व आजार व गंभीर वेदनांपासून त्यांना सोडव. त्यांनी अविरत तुझे गीत गावे व तुझी स्तुती करावी म्हणून हे अनन्य मानवप्रियकरा, ईशजननीच्या प्रार्थनांद्वारे त्यांना उठव.
अभ्यासापूर्वीची प्रार्थना
हे स्वर्गीय राजा, कैवाऱ्या, सत्याच्या आत्म्या, जो सर्वत्र आहेस व सर्वव्यापी आहेस, आशीर्वादांच्या खजिन्या (कोशा) व जीवनदात्याः हे उत्तमा, ये आणि आम्हामधे वस्ती कर, व सर्व अशुद्धतेपासून आम्हाला शुद्ध कर व आमच्या आत्म्याचे तारण कर.
परम धन्य प्रभु, ज्या विषयाचा मी अभ्यास करणार आहे तो मला चांगला शिकता यावा आणि त्याद्वारे तुझ्या गौरवासाठी, माझ्या कुटुंबाच्या सांत्वनेसाठी आणि तुझ्या मंडळीच्या व आमच्या देशाच्या हितासाठी एक चांगली व्यक्ती बनता यावे म्हणून मला बळ देण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा माझ्यावर पाठव. आमेन.
जगात येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करणाऱ्या आणि पवित्र करणाऱ्या, ख्रिस्ता, खऱ्या प्रकाशा, तुझा अगम्य प्रकाश मला (आम्हांला) पाहता यावा म्हणून तुझा मुखप्रकाश माझ्यावर (आमच्यावर) चमकू दे; आणि तुझ्या परम पवित्र आईच्या आणि सर्व संतांच्या मध्यस्थीद्वारे माझ्या (आमच्या) पावलांना तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने चालव. आमेन.
अभ्यासानंतरची प्रार्थना
हे ईशजननी, सदा धन्य परम शुध्द आमच्या देवाची आई, तुला धन्यवाद देणे खरोखर योग्य आहे. करूबांपेक्षा अधिक आदरणीय व सराफांपेक्षा अधिक गौरवी, अतुलनीय : मलिन न होता तु देवाच्या शब्दाला जन्म दिला. हे सत्य ईशजननी आम्ही तुझी थोरवी गातो.
आपल्या शत्रूसाठी प्रार्थना
हे प्रभु येशू खिस्ता, ज्यांनी तुला वधस्तंभावर खिळले त्यांच्या क्षमेसाठी तुझ्या महान दयाळूपणाने तू प्रार्थना केलीस आणि आमच्या शत्रूवर प्रेम करण्यास व आमचा छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास तू आम्हाला शिकवले. प्रभु, मी प्रार्थना करतो की जे माझ्याशी अन्यायाने वागतात आणि माझ्याविरुद्ध बोलतात त्यांना तू क्षमा कर आणि तुझ्या इच्छेनुसार तू त्यांना आशीर्वाद दे व त्यांचे मार्गदर्शन कर. त्यांच्या विरोधात माझ्या मनातील कटुता दूर कर. हे प्रभु, तुझी स्तुती आणि गौरव व्हावे म्हणून, तुझी क्षमा, चांगुलपणा आणि प्रेम आम्हां सर्वांमध्ये प्रकट होवो. आमेन.
अमूल्य कृसाला प्रार्थना
देवाने उठावे; त्याच्या वैऱ्यांची दाणादाण होवो; त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत. जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग होवो; जसे मेण अग्नीपुढे वितळते तशी भुते, देवावर प्रीती करणाऱ्यांच्या व स्वतःवर कृसाचे चिन्ह+ करणाऱ्यांच्या तसेच त्यांच्या उपस्थितीत नष्ट होवोत जे आनंदाने म्हणतातः आनंदित हो, परम आदरणीय व जीवनदायी प्रभूच्या कृसा, कारण तुझ्यावर जो खिळला होता त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तू भुतांना हाकलून लावतो. तो अधोलोकात गेला आणि सैतानाच्या सामर्थ्याला त्याने चिरडले आणि सर्व शत्रूना घालवून देण्यासाठी त्याने आम्हांला तू त्याचा आदरणीय कृस दिला. हे प्रभूच्या परम आदरणीय व जीवनदायी कृसा, पवित्र स्वामीनी, कुमारी ईशजननी आणि सर्व संतांसह सर्वदा मला साहाय्य कर. आमेन.
मिलान के संत अम्ब्रोस का धन्यवाद गीत
हे परमेश्वर, हम तेरी स्तुति करते हैं, तुझे हम प्रभु मानते हैं। सारी पृथ्वी सनातन पिता तेरी आराधना करती है। सब देवदूत ऊंचे स्वर से तुझे पुकारते हैं: स्वर्ग और उसमें मौजूद सारी शक्तियां। करूब और साराप लगातार ऊंचे स्वर से तुझे पुकारते हैं, पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाओं के प्रभू परमेश्वर, स्वर्ग और पृथ्वी तेरी महिमा से भरी है। प्रेरितों का गौरवशाली मंडल तेरी स्तुति करता है। नबियों की नेक संगति तेरी स्तुति करती है। श्वेत वस्त्रधारी शहीदों (रक्त्साक्षियों की) की सेना तेरी स्तुति करती है। पवित्र कलीसिया सारी सृष्टि में तेरा अंगीकार करती है: हे अनंत वैभव के पिता; तेरा माननीय, सच्चा और एकलौता पुत्र; और सहायक पवित्र आत्मा।
हे मसीह, महिमा का तू राजा हैं। आप पिता सनातन पुत्र हैं। मनुष्य को छुड़ाने जब तू आया, तब कुमारी के गर्भ को तूने तुच्छ नहीं जाना। तूने मृत्यु के दंश को हराया और विश्वासियों के लिए स्वर्ग का राज्य खोल दिया। परमेश्वर के दाहिने ओर पिता की महिमा में तू बैठा हैं। हमें विश्वास है कि हमारा न्यायाधीश बनकर तू आएगा। इसलिए हम तुझसे विनती करते हैं, जिन्हे तूने अपने लहू से मोल लिया है तू अपने उन दासों की सहायता कर। अनन्त महिमा में अपने संतों के साथ उनकी गिनती हो ऐसा तू होने दे।
हे परमेश्वर, अपनी प्रजा का उद्धार कर, और अपने निज भाग के लोगों को आशीष दे। उन पर शासन कर और उन्हें सर्वदा के लिये ऊँचा उठा। दिन-प्रति-दिन हम तुझे धन्य कहते हैं; और युगानुयुग तेरे नाम की स्तुति करते है। हे ईश्वर, प्रदान कर की इस दिन हम पाप मुक्त रहे। हम पर दया कर, हे प्रभु, हम पर दया कर। हे प्रभु, जैसी तुझ पर हमारी आशा है, वैसी ही तेरी करुणा भी हम पर हो। हे मेरे परमेश्वर, मैं ने तुझी पर भरोसा रखा है, मुझे लज्जित होने न दे। आमीन।
ऑप्टिना के प्राचीनों की प्रार्थना (молитва оптинских старцев)
हे प्रभु, ऐसा होने दे की यह आने वाला दिन मेरे लिए जो कुछ लाए उसे मै आध्यात्मिक शांति के साथ स्वीकार सकू।
हे प्रभु, ऐसा होने दे की मैं अपने आप को पूरी तरह से तेरी पवित्र इच्छा के प्रति समर्पित कर दूं।
हे प्रभु, इस दिन के हर पल, सभी चीजों में मेरा मार्गदर्शन और समर्थन कर।
हे प्रभु, दिन भर में जो भी समाचार मेरे पास पहुँचे, मुझे उसे शांत मन और दृढ़ विश्वास के साथ स्वीकार करना सिखा कि सब कुछ तेरी पवित्र इच्छा के अधीन है।
हे प्रभु, मेरे और मेरे आस-पास के लोगों के प्रति अपनी पवित्र इच्छा मुझ पर प्रकट कर।
हे प्रभु, मेरे सभी शब्दों और कार्यों में मेरे विचारों और भावनाओं को निर्देशित कर।
हे प्रभु, सभी अप्रत्याशित घटनाओं में, मुझे यह मत भूलने दे कि सब कुछ तेरी ओर से भेजा गया है।
हे प्रभु, मुझे अपने पूरे परिवार और मेरे आसपास के लोगों, बड़ों, हमउम्र और छोटों के साथ उचित, सरलता से, समझदारी से व्यवहार करना सिखा, ताकि मैं किसी को दुखी न करूं, बल्कि भलाई के लिए सभी की मदद करूं।
हे प्रभु, मुझे आने वाले दिन की थकान और उसके दौरान होने वाली सभी घटनाओं को सहने की शक्ति प्रदान कर।
हे प्रभु, मेरी इच्छा को निर्देशित कर और मुझे प्रार्थना करना, विश्वास करना, आशा करना, धैर्य रखना, क्षमा करना और प्रेम करना सिखा।
हे प्रभु, मुझे अपने शत्रुओं की निरंकुशता के हवाले न कर, परन्तु अपने पवित्र नाम के निमित्त, मुझ पर शासन कर और मेरी अगुवाई कर।
हे प्रभु, दुनिया को नियंत्रित करने वाले तेरे शाश्वत और अपरिवर्तनीय नियमों को समझने के लिए मेरे मन और हृदय को प्रकाशित कर, ताकि मैं, तेरा पापी दास/दासी, तेरी और मेरे पड़ोसियों की ठीक से सेवा कर सकूं।
हे प्रभु, मेरे साथ जो कुछ भी होगा, उसके लिए मैं तुझे धन्यवाद देता हूं, क्योंकि मैं दृढ़ता से विश्वास करता हूं कि जो लोग तुज़से प्यार करते हैं, उनके लिये सब बातें मिलकर भलाई ही को उत्पन्न करती हैं।
हे प्रभु, मेरे सभी आना जाना, कार्यों, शब्दों और विचारों को आशीष दें, और ऐसा होने दे की मै सदा आनंद से तेरी महिमा कर सकू, गीत गा सकू और धन्यवाद् दे सकू, क्योंकि तू धन्य हैं युगों युगों तक। आमीन।
उपवास समयातील
सीरियाच्या संत एफ्राईमची प्रार्थना
हि प्रार्थना शनिवार व रविवार वगळता संपूर्ण लेंत समयात करतात.
हे माझ्या जिवाच्या प्रभू व स्वामी, आळसपणाचा, निराशेचा, महत्त्वाकांक्षेचा आणि मूर्ख बडबडीचा आत्मा मज देऊ नको. (दंडवत)
तर उलट शुद्धतेचा, नम्रतेचा, संयमाचा आणि प्रेमाचा आत्मा तुझ्या सेवकाला प्रदान कर. (दंडवत)
होय, हे प्रभू व राजा, मी स्वतःच्या उणिवा पहाव्या व आपल्या बंधूला दोष लावू नये असे तू प्रदान कर, कारण युगानुयुग तू धन्य आहेस. आमेन. (दंडवत)
१२ वेळा, कमरेपासून वाकून आदरासह भूमीला स्पर्श करीत म्हणावेः हे परमेश्वरा, मज पाप्याला शुद्ध कर. आणि मग संपूर्ण प्रार्थनाः
हे माझ्या जिवाच्या प्रभू व स्वामी, आळसपणाचा, निराशेचा, महत्त्वाकांक्षेचा आणि मूर्ख बडबडीचा आत्मा मज देऊ नको. तर उलट शुद्धतेचा, नम्रतेचा, संयमाचा आणि प्रेमाचा आत्मा तुझ्या सेवकाला प्रदान कर. होय, हे प्रभू व राजा, मी स्वतःच्या उणिवा पहाव्या व आपल्या बंधूला दोष लावू नये असे तू प्रदान करय कारण युगानुयुग तू धन्य आहेस. आमेन. (दंडवत)