ह्यावेळस याजकगण वस्त्र बदलतात म्हणून योग्य वेगाने प्रहर करावेत
याजकः धन्यवादीत आहे आपला देव, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग.
मंडळीः आमेन.
मृत्यूला मृत्युद्वारे तुडवून आणि कबरेत असलेल्यांना जीवन देऊन खिस्त मृतांतून उठला आहे. (३)
पुनरुत्थानाचे गीत, स्वर ६ वा.
खिस्ताचे पुनरूत्थान पाहून, / एकमात्र निष्पाप पुरूष / पवित्र प्रभु येशूची आपण उपासना करू. / हे खिस्ता, आम्ही तुझ्या कृसाचा आदर करतो, आणि तुझ्या पवित्र पुनरूत्थानाची आम्ही स्तुती व गौरव करतो, कारण तू आमचा परमेश्वर आहेस/आणि तुझ्या खेरीज आम्ही कोणालाही ओळखीत नाही, तुझ्याच नावाने आम्ही आरोळी मारतो, / सर्व विश्वासणाऱ्यांनो या, आपण खिस्ताच्या पवित्र पुनरूत्थानाचा आदर करू./कारण, पाहा, कृसाद्वारे आनंद जगामध्ये आला./ प्रभूच्या पुनरूत्थानाची थोरवी गात/आपण सदा त्याला धन्यवाद देऊ,/ कारण आपल्यासाठी कृस सोसून, / मृत्यूला मृत्युद्वारे त्याने नष्ट केले. (३)
इपकोई (लक्षपूर्वक ऐकणे), स्वर ८ वा.
प्रभाताआधी, मरीयेसह स्त्रियां आल्या व कबरेवरून धोंड लोटलेली त्यांस आढळली. देवदूताचा आवाज त्यांनी ऐकला अक्षय ज्योतीमध्ये वास करणाऱ्याचा शोध तुम्ही मर्त्याप्रमाणे मेलेल्यांमध्ये का करता? पहा कबर वस्त्रे ! लवकर जा व जगाला घोषणा करा, प्रभू उठला आहे व व जगाचे तारण करणारा तो देवाचा पुत्र आहे म्हणून मृत्यूचा त्याने वध केला आहे.
कोन्ताकिओन, स्वर ८ वा.
जरी तू अधोलोकांत उतरला, हे अमर्त्या, तरी तू अधोलोकाचे सामर्थ्य नष्ट केले आणि विजयी होऊन पुनरुत्थित झाला, हे खिस्ता आमच्या देवा, गांधारसधारी स्त्रियांना आनंद करावयास सांगून आणि तुझ्या प्रेषितांना शांती देऊन, तू पतन पावलेल्यांना पुनरुत्थान प्रदान केले.
त्रोपारीओन, स्वर ८ वा.
कबरेमध्ये देहासह पण अधोलोकामध्ये देव म्हणुन आत्म्यासह, सुखलोकामध्ये चोरासह आणि सिंहासनावर पिता आणि पवित्र आत्म्यासह हे अमर्याद ख्रिस्ता, तू सर्वकाही व्यापले आहे.
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो,
जीवन धारक असल्यामुळे व सुखलोकापेक्षा अधिक सुंदर असल्यामुळे, खरोखर कोणत्याही वैभवी महालापेक्षा अधिक तेजस्वी अशी, आमच्या पुररूत्थानाचा स्त्रोत, हे खिस्ता, तुझी कबर प्रकट झाली.
आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.
हे परात्पराच्या पवित्र व दिव्य मंडपा, आनंदित हो (प्रणाम)! कारण तुझ्याद्वारे, हे ईशजननी, त्यांना आनंद दिला आहे जे म्हणतात : "हे निर्दोष स्वामिनी, स्त्रियांमध्ये तू धन्य."
प्रभू, दया कर. (४०)
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.
करुबांपेक्षा आदरणीय आणि सराफांपेक्षा अधिक गौरवी आणि अतुलनीय, मलीन न होता तू देवाच्या शब्दाला जन्म दिला, हे सत्य ईशजननी, आम्ही तुझी थोरवी गातो.
मंडळीः प्रभूच्या नावात आशीर्वाद द्या, आचार्य.
याजकः आमच्या पवित्र वडिलांच्या प्रार्थनांव्दारे, प्रभू येशू ख्रिस्ता आमच्या देवा, आम्हावर दया कर.
मंडळी: आमेन.
मंडळीः मृत्यूला मृत्युद्वारे तुडवून आणि कबरेत असलेल्यांना जीवन देऊन खिस्त मृतांतून उठला आहे. (३)
पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला गौरव असो, आता आणि सर्वकाळ व युगानुयुग, आमेन.
मंडळीः आशीर्वाद द्या, आचार्य.
याजकः मृतातून पुनरूत्थीत झालेला, ख्रिस्त आपला खरा देव, उत्तम व मानवप्रियकर आहे म्हणून त्याच्या परम शुध्द आईच्या आणि सर्व संताच्या प्रार्थनांव्दारे आपल्यावर दया करो आणि आपले तारण करो.
मंडळी: आमेन.